या फुलांवरून त्या फुलांवर सैरभैर फिरणारे, निसर्गाने मुक्तछंदाने केलेली रंगांची उधळण आणि मरगळल्या मनालाही प्रफुल्लित करणारी ती सुंदरता, अशी फुलपाखरांची ओळख आहे. फुलपाखरांचे विश्व देखील अजब आहे. त्यांची आणि फुलांची प्रीती तर अजरामरच आहे. जैवविविधता आणि पर्यावरण संतुलनात ते महत्वाची भूमिका पार पाडतायेत. सामान्यतः फुलपाखरे ही सर्वांना परिचित अशीच आहेत. मात्र त्याकडे कुणी फारस लक्ष देत नाही, शिवाय लहान मुलांच्या. पण तेही अगदी मर्यादित राहतं. मात्र आजच्या घडीला तोही छंदाचा, अभ्यासाचा आणि संशोधनाचा विषय असु शकते या बद्दल तरी कुणाच दुमत नसेल. अनेक वनवेडे फुलपाखरूप्रेमी व संशोधक फुलंपाखरांच्या अभ्यासापायी झपाटले आहेत. फुलपाखरू संशोधक म्हणून आयझॅक किहीमकर व कृष्णमेघ कुंटे ही सध्या भारतातील अग्रगण्य नावे आहेत.
फुलपाखरू हे एक प्रकारचे कीटक आहे. त्यांचा अभ्यास करण्याचा शास्त्राला ‘ऐंटॅमॅालॅाजी’ (Entomology) म्हणतात. फुलपाखरु हे ‘लॅपीडोप्टेरा’ (Lapidoptera) या गटात मोडतात. आज जगभरात ज्ञात असलेल्या किटकांची संख्या एक लाख पन्नास हजार इतकी असून पैकी जगात १७,८२४ इतकी फुलपाखरे आहेत. अलीकडील आकडेवारीनुसार भारतात १,५०५ इतकी फुलपाखरे आहेत. हीच संख्या महाराष्ट्रात २७७ च्या घरात आहे. फुलपाखराच्या पुच्छ कुळ (Papillionidae), कुंचलपाद कुळ (Nymphalidae), निल कुळ (Lycaenidae), पितश्वेत कुळ (Pieridae), चपळ कुळ (Hesperidae) आणि मुग्धपंखी कुळ (Riodinidae) अशी सहा कुळे (Family) आहेत. विदर्भात १८५ प्रजाती तर मेळघाटात एकूण १२७ प्रकारची फुलपाखरे आढळतात. मेळघाट, ताडोबा, पेंच व इतर जंगल परिसरात आपण निरीक्षण केल्यास २० ते २५ फुलपाखरांच्या प्रजाती आपल्याला एकाच भेटीत नक्कीच पाहायला मिळतील. फुलपाखरे ही अन्नसाखळीत महत्वाची असल्यामुळे त्यांचे अस्तित्व हे स्वच्छ पर्यावरणाचे प्रतिक आहे. सातपुडा व सह्याद्री व त्यालगतच परिसर फुलपाखरांच्या बाबतीत समृद्ध आहे. आपण अनेक दुर्मिळ तशीच इतरही फुलपाखरे तिथे मोठ्या संख्येने पाहू शकतो. तेथे फुलपाखरांची संख्या सुद्धा मोठ्या प्रमाणात आपल्याला दिसून येते. विशेष म्हणजे महाराष्ट्र राज्याने भारतात पहिल्यांदाच आपलं राज्य फुलपाखरू जाहीर केले आहे. ‘निलवंत’ (Blue Mormon) हे आपलं राज्य फुलपाखरू आहे.
सह्यान्द्री व सातपुडा पर्वत परिसरातील फुलझाडे व इतर वनस्पतीजीवन समृद्ध असल्याने इथे फुलपाखरांची वैविध्यता देखील मोठ्या प्रमाणात दिसून येते. कारण फुलपाखरांचा मुख्य आधार हे वनस्पतीच असते. त्याच वनस्पतीवर ते आपली गुजराण करतात व त्यांच्या उगवणाऱ्या फुलातील मधुरस घेतात. हे त्यांचे मुख्य उर्जास्त्रोत आहेत. साधारणतः जुलै ते नोव्हेंबर हा काळ फुलापाखरांसाठी आणि त्यांच्या निरीक्षणासाठी अनुकूल मानला जातो. कारण यादरम्यान आपल्याला उत्कृष्ट जातीची आणि काही दुर्मिळ फुलपाखरे पाहणे शक्य होते. याच काळात फुलपाखरांची संख्या म्हणजे घनता सुद्धा सर्वाधिक असते. जसजसा उन्हाळा सुरु होतो तसतसा त्यांच्या संख्येवर परिणाम जाणवतो. उन्हाळ्यात बरीच फुलपाखरांचे कोश सुप्तावस्थेत असतात. त्यामुळे फुलपाखरांची संख्या कमी दिसते.
फुलपाखरे निरीक्षण करण्याचा छंद हा पक्षीनिरीक्षणाप्रमाणेच आनंद देणारा आहे. यातून अनेक गुढ गोष्टींना उजाळा मिळतो. निसर्गाच्या भव्य अश्या खजिन्यातील एका चिमुकल्या रत्नाचे निरीक्षण आपल्याला प्रचंड आनंद देऊन जाते. ‘दोस्ती करुया फुलपाखरांशी’ या लेखमालेत आता आपण फुलपाखरांची माहिती घेऊया, त्यांच्याशी दोस्ती करुया…!
@ यादव तरटे पाटील
सदस्य – राज्य वन्यजीव मंडळ, महाराष्ट्र शासन
भ्रमणध्वनी – ९७३०९००५००
ईमेल – disha.wildlife@gmail.com
फुलपाखरे जतन करणे काळाची गरज आहे आपला हा उपक्रम खूपच प्रशंसनीय आहे
धन्यवाद भाऊ
फुलपाखरांचा आपला गाढा अभ्यास आहेच, यात शंका नाही परंतु आम्हालाही फुलपाखरविषयी अधिक माहिती दिल्याबद्दल आपले धन्यवाद.
धन्यवाद राहुल
अत्यंत सोप्या भाषेत व आपल्या खास शैलीत आपण खूपच उपयुक्त माहीती लिहिलीत याबद्दल आपले हार्दिक अभिनंदन।
आपण नेहमीच पर्यावरण, निसर्ग व वन्यजीवांवर प्रेम करत आलात व बहुमूल्य माहिती देत आलात यात शंकाच नाही। आपण एक
चिकित्सक व निरीक्षण प्रिय अभ्यासक आहात यात दुमत नाही व कोणतीही गोष्टीच्या मुळापर्यंत जाणे हा आपला पिंड आहे। सखोल निरीक्षण हा आपल्या प्रत्येक लेखात प्रामुख्याने आढळतो।
आपला लेख अवर्णनीय आहेच व अत्यंत अभ्यासपूर्वक निरीक्षण व लिखाण याचा सुंदर मिलाप आहे।
दुसरी महत्त्वाची बाब म्हणजे फक्त रंगबेरंगी फुलपाखरू,त्याचे आकर्षक दिसणे नक्कीच मनाला भुरळ पाडते व नकळत आपण त्या विश्वात रमबाण होतो।
आपला लेख मग तो कोणत्याही विषयावर असो वाचक पूर्णपणे वाचतो। याला कारण म्हणजे अत्यंत वास्तविकपणे लिहलेले निरीक्षण व दिलखेचक लेखनशैली।
बरे असो।
आपल्या लेखात एक उणीव आहे असे मला वाटते।
फक्त मोहक दिसणे, रंगीबेरंगी रंग यास्तवच त्याची निर्मिती झाली नाही। अत्यंत अल्पायुषी कालावधीत परागिकर्णाचे बहुमूल्य काम फुलपाखरू करतो म्हणूनच हा निसर्ग नटलेला व मोहक दिसतो। या बहरलेल्या व आकर्षक निसर्गाला कोणी सजवलेले असेल तर ते फुलपाखरे यांनी।
त्यामुळे Pollination म्हणजेच परागिकर्णाचा उल्लेख महत्वाचा आहे।
बरेच वेळा फुलपाखरे चिखलात बसलेली असतात। नर फुलपाखरू या चिखलातून क्षार घेतात यामुळे शुक्रजंतू ताकदवर होतात।
लेख नेहमीप्रमाणे दिलखेचक।
मी काही तज्ञांचे यादीत नाही।
असेच लिहीत जा। निसर्गाबद्दल सर्वांच्या मनात प्रेम निर्माण करा।
हा निसर्ग वाचला तरच आपण वाचू,
नाहीतर इतिहासजमा होऊ यात शंकाच नाही।
सुंदर लेख।
गुरुजी खूप खूप धन्यवाद
आपल्या सूचनेची दखल घेतली, अनंत आभार,
आदरणीय गुरुजी
धन्यवाद
बढ़िया….निसर्ग माहितीचे नविन दालन उघडले… नेहमी प्रमाणे अप्रतिम लिहिलं
धन्यवाद अमोल भाऊ
फुलपाखरू बाग(butterfly g a r d e n ) कंस बनवायंच
कृपया मला फोन करा,
निसर्गाच्या विविधतेचे दालन ऊघडून माहिती ऊपलब्ध करून दिल्याबद्दल धन्यवाद
धन्यवाद सर
Nice!
Thank you very much
. मन फुलपाखरासारखे चंचल असते, माणसाचे वय काहीही असो फुलपाखरू दिसल्यावर फुलपाखरामागे धावावे असे
वाटतेच…… लेख नेहमीप्रमाणेच उत्तम झाला आहे… मला आवडला….. माझ्या माहितीत भर पडली आहे… धन्यवाद..??
खूप खूप आभारी आहे MADAM
अत्यंत सुंदर लेख यादवराव… आमच्या सारख्याना या लेखातून शिकण्या सारखे खुप काही आहे …
धन्यवाद