कोविड-१९ मुळे संपूर्ण जग लॉकडाऊन झालंय. मात्र महसुल, पोलीस आणि आरोग्य यंत्रणा दिवसरात्र आपल्यासाठी कार्य करीत आहे. सगळीकडे त्यांच कौतुक होत आहे, आणि ते झालही पाहिजे, कारण संपूर्ण मानवप्रजातीच्या सुरक्षिततेसाठीच ते झटत आहेत. मात्र आपल्याला प्राणवायू, पाणी आणि अन्न देणाऱ्या जंगलाच काय..? त्याच्या रक्षणाच काय..? हा विचार तुमच्या मनात कधी आलाय का..? जंगल आम्हाला प्राणवायू देते, पावसाच पाणी जंगलामुळे जमिनीत मुरते, झरे फुटतात आणि नद्यांचा उगम होतो म्हणूनच नद्यांमध्ये पाणी वाहते. जमिनीत मुरलेले तेच पाणी विहिर, वाहणारे पाणी नदी आणि धरणांच्या माध्यमातून आम्ही शेतपिकांना देतो. म्हणजेच आम्हाला श्वास घ्यायला ऑक्सिजन, तहान लागल्यावर प्यायला पाणी व भूक लागल्यावर खायला अन्न हे जंगलापासून मिळतंय.
प्राणवायू, पाणी आणि अन्न देणाऱ्या जंगलाच्या रक्षणाची जबाबदारी कुणाकडे..! तर वन विभागाकडे आणि वनविभागाच्या त्या शिलेदाराकडे आहे, जे तळागळात राहून काम करीत आहेत. आज वनरक्षक, वनपाल आणि त्यांना पाठबळ देणाऱ्या महाराष्ट्र वनसेवेतील आणि भारतीय वनसेवेतील वनाधिकारी यांच्यामुळे ही आपली राष्ट्रीय संपती टिकून आहे. कोरोना सारख्या महाभयंकर संकटातही त्यांचे वनरक्षण मोठ्या जोमाने आणि ताकदीने सुरु आहे. आमच्या मेलघाटचा आदिवासी कोरकू वाघाला आईचा भाऊ या नात्याने ‘कुलामामा’ म्हणतो. कोरकू भाषेत वाघ म्हणजे ‘कुला’ होय. आम्ही मेळघाटीयांनी यावर एक कविता केली होती. त्यात आम्ही अस म्हणतो की,
‘ कुला बचेगा तो जंगल बचेगा,
जंगल बचेगा तो नद्दी बचेगी,
नद्दी बचेगी तो पाणी बचेगा,
पाणी बचेगा तो इन्सान बचेगा..!’
हे ईतकं साध गणित या कोरकुंना कळलं आहे. यात इतरांचा क्रमांक कुठे आहे..? यावर आम्ही विचार करून कृती करायची वेळ आली आहे. म्हणजेच डोळ्यात अंजन घालणारे सत्य आम्हाला स्वीकारावे लागणार आहे. आज कोविड – १९ मुळे मानवप्राणी बंदिस्त झाला आहे तर पोपट आणि इतर प्राण्यांना पिंजऱ्यात ठेऊन आपला अघोरी शौक पूर्ण करणाऱ्या माणसावर मात्र पिंजऱ्यात राहायची वेळ यावी, ही सुद्धा एक निसर्गाची युक्तीच म्हणावी लागेल. ‘जैसी करणी वैसी भरणी’ या म्हणीची आता प्रचीती येत आहे. कोरोना हा चीननिर्मित की निसर्गनिर्मित हा येणारा काळ ठरवेल. आपला प्राणवायू, पाणी आणि अन्न देणाऱ्या जंगलाची राखण जर कुणी करीत असेल तर ते म्हणजे आमचे वनसैनिक करीत आहेत. वन विभाग व वनकर्मचारी या अर्थाने अतिशय महत्वाचे ठरतात. आपले अस्तित्व टिकविण्यासाठी म्हणजेच जगण्याला अत्यावश्यक असणारी ही उघड्यावरची संपत्ती आज त्यांच्या हातात सुरक्षित आहे. आजच्या कोरोनाच्या महाभयंकर महामारीत देखील वनरक्षक आपल्याच अस्तित्वासाठी आपली सेवा देत आहे. ही सुद्धा एक मानवसेवा आणि देशसेवाच आहे.
जंगलात नियमित गस्त करणे, वन जमिनीवरील अवैध अतिक्रमण हटविणे, वनाचे आणि वन्यजीवांचे शिकाऱ्यांपासून रक्षण करणे, अवैध वृक्षतोड करणाऱ्यावर लक्ष ठेऊन कारवाई करणे, वन्यप्राण्यांचे रक्षण करणे, वन्यप्राणी प्रगणना करणे, वन्यप्राणी जिथे पाणी प्यायला येतात त्या नैसर्गिक व कृत्रिम पाणवठयाचे व्यवस्थापन करणे, वनवनवा लागू नये म्हणून काळजी घेणे आणि वनवा लागल्यास तो विझविणे, मानव वन्यजीव संघर्ष निर्माण झाल्यास त्या ठिकाणी सेवा देणे प्रसंगी त्यांचे व्यवस्थापन करणे, वन्यप्राणी मनुष्यवस्तीमध्ये किंवा वस्तीलगत आढळल्यास रेस्क्यू करणे, आपली बीट, वनखंड, वनवर्तुळ आणि वनपरीक्षेत्राची नियमित पाहणी करणे. एकूणच जंगलाला होणाऱ्या संभावित धोक्यापासून संरक्षण करणे. अशी अनेक कामे आमचा वनरक्षक आणि वन विभाग करीत आहे. विशेष म्हणजे आपलं कर्तव्य सांभाळून व्याघ्र प्रकल्प, अभयारण्य आणि राखीव जंगलातील आणि जंगलालगतच्या अनेक गावांममध्ये जाऊन कोरोनापासून करावयाचे संरक्षण आणि घ्यावयाची काळजी यावरही जनजागृती करीत आहे. बर यात आमचे वन मार्गदर्शकही मागे नाहीत. ज्ञानगंगा अभयारण्यातील वन मार्गदर्शकांनी कोरोना बाबत अभयारण्य परिसरातील गावागावात जाऊन पथनाट्य आणि इतर माध्यमातून जनजागृती केली. आज पर्यटन व्यवसाय ठप्प झालेल्या वनमार्गदर्शकांना काम नाही अश्या परिस्थितीतही त्यांनी केलेल्या कार्याचे कौतुक करावे तितके कमीच आहे. तसेच संकट समयी मदतीचा हात देऊन मेळघाट व्याघ्र प्रकल्पानेही वनमार्गदर्शकांना अनधान्य उपलब्ध करून दिले हे देखील वाखाणण्याजोगे आहे.
आज संपूर्ण महाराष्ट्रात संचारबंदीच्या काळात वनरक्षक व वन विभाग वन रक्षणाचे काम करीत आहे. अमरावती प्रादेशिक वन विभागाअंतर्गत येणाऱ्या महेंद्री आणि पोहरा मालखेड राखीव वनात, मेळघाट प्रादेशिक वन विभाग आणि मेळघाट व्याघ्र प्रकल्पाअंतर्गत येणारे वनरक्षक आणि वनपाल आपली सेवा देत आहेत. या संदर्भात मी काही वनरक्षकांशी संपर्क केला आणि त्यांच्या भावना जाणून घेतल्या. अतिशय उत्साहाने त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. यात पुरुष आणि महिला दोनीही आपल्या सेवा देत आहेत. हे इथे विशेषत्वाने नमूद करावेसे वाटते. कोरोना संचारबंदीच्या काळात एकीकडे वाढत्या शिकारी व इतर अवैध घटना घडत असतांना त्यांचावर हल्ले देखील होत आहेत. पूर्व मेळघाट वन विभागाअंतर्गत अकोट मधील ज्ञानेश्वर चिंचोळकर आणि मेळघाट व्याघ्र प्रकल्पाअंतर्गत येणाऱ्या सेमाडोह येथील विशाल मेहरे अश्या दोन वनरक्षकांवर स्थानिकांनी हल्ला केला आणि त्यात ते जखमी सुद्धा झालेत. इतकंच काय तर विशाल मेहरे यांच्यावर एट्रोसिटी अंतर्गत तक्रार देखील दाखल केली आहे. ते आपली सेवा देत असतांना त्यांच्यावर होणारे हल्ले निश्चितच निषेधार्ह आहेत. याबाबत काही अधिकाऱ्यांनी स्वतःहून तर काहींनी निवेदन देऊन का होईना पण याबाबत उचित पावले उचलली आहेत. जंगल रक्षण करतांना स्थानिक पातळीवर येणाऱ्या अनेक अडचणी यातून पुन्ह्या एकदा नव्याने समोर आल्या आहेत. स्थानिक गावकऱ्यांशी संवाद ठेऊन आणि प्रसंगी कठोर होऊन कारवाई करणे अनेकदा कसे अडचणीचे ठरते हे यातून स्पष्ट होते. याबाबत त्यांना उचित न्याय मिळेल अशी निसर्गाकडे प्रार्थना करुया.
एरवी कर्तव्यावर असणाऱ्या वनरक्षकांच फारसं कुणी कौतुक करतांना दिसत नाही. मात्र कोरोनाच्या या महाभयंकर संकटात सुद्धा वनरक्षक आणि वनविभाग आपली सेवा देत आहे. हे निश्चितच कौतूकाची बाब आहे. वाघापासून ते वाळवीपर्यंत संपूर्ण जैवविविधता आणि समृद्ध वनसंपदा सुरक्षित ठेवण्याच महान कार्य वन विभाग करीत आहे. आपल मानवाच अस्तित्व याच अन्नसाखळीवर अवलंबून आहे. म्हणून यांच संवर्धन आणि संरक्षण ही जीवनावश्यक बाब आहे. हा लेखप्रपंच करण्याचा मानस हाच आहे की, एक कौतुकाची थाप उर्जा देते तर यातून नवी उमेद जागृत होते. म्हणून आम्ही या वनसैनिकांच सुद्धा भरभरून कौतुक करायलाच हवं. सातपुड्याच्या कुशीत वसलेल्या मेळघाटच्या दऱ्याखोऱ्यापासून ते थेट सह्यान्द्रीच्या कुशीत वसलेल्या आणि जंगलांचे संरक्षण करणाऱ्या तमाम वनरक्षकांना माझा हा विशेष सलाम….! जय हिंद ….!
@ यादव तरटे पाटील
वन्यजीव अभ्यासक
दिशा फाउंडेशन, अमरावती
०९७३०९००५००
disha.wildlife@gmail.com
वन्यजीव संवर्धन ही सर्वच देशातील नागरिकांची प्राथमिक जबाबदारी आहे. विशेष करून तरुणांची यात महत्वाची भूमिका…
छोटा पाणपोपट हा पक्षी वेडा राघू नावानेच अधिक परिचित आहे. या पक्ष्याच आपण 'वेडा राघू'…
एका गावात एका मुलीला उडणारे पक्षी खूप आवडायचे, पण एक दिवस राजा अचानक पक्षी मारायचं…
Are butterflies poisonous? You will be perplexed if you ask this question. We know that…
फुलपाखरे विषारी असतात का.? हा प्रश्न विचारला तर तुम्ही नक्कीच बुचकळ्यात पडाल. साप, विंचू व…
View Comments
खरंच काम करतोय त्या बाबत गवॆ वाटते तुमच्या लेखा मुळे??
तरटे साहेब नमस्कार आपण खूप चांगलं लेख लिहलं।
आम्हा देश वासियांना निसर्गाची मोफत देणगी मिळाली आहे ।त्या मुळे आम्हाला त्याची किंमत कळत नाही।आम्ही सिमेंट चे जंगल उभे करणे मध्ये व्यस्त आहो।जनता उदासीन त्यापेक्षा हि शाषण उदासीन
प्रिय ओंकार शेळके साहेब
धन्यवाद आपण प्रतिक्रिया दिल्यात.आपलं म्हणन अगदी बरोबर आहे, खर म्हणजे आपण स्वतः काम करुया. हेही नसे थोडके,,,!
आभारी आहे.
धन्यवाद धस्कट साहेब
जेव्हा सर्व समाज आज दरवाजा बंद आहे तेव्हा आम्हा सर्व वनविभागातील कर्मचारी याची जबाबदारी व कर्तव्य आणखी वाढतात.प्रत्यक्ष लोकांशी सबंध येत नसल्याने दुर्लक्षित आहे.आपण लिखाण केले ल्या लेखा मुळे निश्चित सर्व कर्मचाऱ्यांना समाधान वाटेल व निरंतर कोणती ही उत्सव, सण, व या कोरोना (covid 19) मध्ये सुद्धा आपले कर्तव्य जबाबदारीने पार पाडत आहे.........धन्यवाद
प्रिय आशितोष जी
खरच आहे, जबाबदारी वाढली आहे.
आभार आणि धन्यवाद
प्रिय यादवजी, आम्हा वनसैनिकांच्या कार्याची दखल घेतल्याबद्दल आपले खुप खुप आभार. आपल्या या लेखामुळे आमचा उत्साह निश्चितपणे द्विगुणीत झालेला असून पुढे दुप्पट ऊर्जेने वन व वन्यजीव संरक्षणाचे कार्य करण्याचे बळ मिळाले आहे.
धन्यवाद !
???
प्रिय इंद्रजीत भाऊ
आपल्या सारख्या मंडळीमुळे आपली वनसंपदा टिकून आहे.
आभारी मीच आहे. धन्यवाद
वनकर्मचारी हे निवड कर्मचारीच नसून वन व वन्यजीवांचे संरक्षण तथा संवर्धन करणारे असून समाजातील विशेष घटक आहेत . त्यांच्याकडे समाजाचा पाहण्याचा दृष्टिकोन हा आपुलकीच्या भावनेतून पाहिल्यास सरस आहे .
प्रिय विलास कोसनकरजी
आपल म्हणणं अगदी खरय.
धन्यवाद आणि शुभेच्छा
खरंच वनरक्षक,वनपाल,वनेक्षत्रपाल या क्षेत्रीय वनअधीकारी करीता गौरवपूर्ण लेख आज वृक्ष का आवश्ययक आहे ते कोरोना कसे वाचवत आहे . तसेच प्राणवायू का गरजेचे आहे हे आत्तातरी जनतेने ओळखून निर्सग चक्र वाचविन्यास मदत करने गरजेचे आहे जेने करून तृण भक्षक व मासभक्षक यांचा चक्र समतोल पने चालन्यास मदत मिळेल पर्यायाने मानव जातीस भविष्यात कोरोना सारखा रोग धोखा घेवून घरात रहावे लागणार नाही
प्रिय धोटे साहेब
अगदी बरोबर आता नागरिकांनी याच महत्व जाणून घ्यायला हवं.
प्रतिक्रिया दिल्याबद्दल धन्यवाद.
खरच साहेब तुम्ही लिहिलेल्या लेखामुळे आम्ही काम करतो या गोष्टीचा आम्हाला गर्व आहे तुम्हाला वनसैनिका बद्दल अभिमान आहे त्या बद्दल धन्यवाद.
प्रिय खडसे साहेब
बरोबर, मला सुद्धा आपल्या वनरक्षकावर गर्व आहे.
धन्यवाद
सरजी, आम्ही सर्व गाईड आपले आभारी आहोत ??
धन्यवाद राजू
मला तुझ्यावर आणि आपल्या टीमवर अभिमान आहे.
प्रिय यादवरावजी ,
ही बहूधा स्वा्तंत्रा नंतर प्रथम वेळ असेल की , लॉक डाउन मधे वनविभागाच्या सेवा अत्यावश्यक सेवेत गनल्या गेल्या त्या करिता सर्व प्रथम महाराष्टट्र राज्याचे वनबल प्रमूख व केंद्राचे वन प्रमूख या़नी केंद्र सरकार ला वने व वन्यजीव यांचे महत्व पटवून देवून वने व वन्ययीवा बाबत आदर ठेवला त्या करीता धन्यवादास पात्र ठरले .
but परंतू
या महामारीच्या संकटात वने व वन्ययीव वाचविने करीता कोनतेही गाजावाजा न करता निमूट पणे आपले कर्तव्य बजावनारे द-याखो-यातील वनरक्षक , वनपाल , वनश्क्षेत्रपाल व त्यांना मनोभावे मदत करनारे आमचे वनमजूर , रोजंदारी मजूर या महामारीच्या काळात जिवाची पर्वा न करता गून्हे उघडकीस आनत आहे
वने व वन्यजीव हे वाचविने किती गरजेचे आहे हे आम जनतेला तसेच
शासनाला पटवून देन्यास कूठेतरी कमी पडत आहे .
काही का असोना आपन वनअधीका-यांची काळजी आपल्या लेखणी मधून प्रगट केला त्या बाबत आपले आभारी आहे .
धन्ययवाद
Thanks Tarate sir, nicely explained the importance and correlation of forest/ wildlife with human life, i am always wondering when people will understand this that our existence is directly depend on forest/nature, Tigers, i.e. conservation of wild life. Thanks to God people like you working hard continuously to spread the awareness and importance regarding the same, keep up the good work.
Thanks a lot!
WOW happy to c u here dear dr.deepak sir,
hope people will understand our nature & its important.
thank you very much for your appreciation.
Regards
वनसंरक्षणामध्ये मोलाचा वाटा असतो तो वनपाल, वनरक्षकांचाच. अशा या दुर्लक्षित व्यक्ती विषयी आपण जो प्रकाश पाडला तो खरोखरच स्तूत्य आहे. त्यांचेबरोबर आपलेही कौतूक करणे हे माझे कर्तव्य आहे. दोघांचेही अभिनंदन. -प्र.सु.हिरुरकर.
आदरणीय गुरुजी
धन्यवाद,
आपलं म्हणन बरोबर आहे.
आपली कौतुकाची थाप माझ्यासाठी खूप महत्वाची आहे. आपला आशीर्वाद कायम असुद्या...!