खगायनकार : डॉ अनिल पिंपळापुरे

खगायनकार : डॉ अनिल पिंपळापुरे

पृथ्वी निसर्ग नियमानुसार चालते. आपण जे पेरतो तेच उगवते. पुन्हा पुन्हा पेरले की पुन्हा पुन्हा उगवते. म्हणजेच कोणतीही गोष्ट वा आवडिच कार्य करण्यासाठीची वेळ कधीच निघून गेलेली नसते. वेळ आणि काळ परत येत राहतो आणि जात राहतो. निसर्ग आपल्याला पुन्हा पुन्हा संधी देतच असतो. फक्त ती आपल्याला ओळखता आली पाहिजे. आयुष्याकडे सकारात्मक आणि शाश्वत दृष्ट्या पाहिल्यास वाटेल ते शक्य असते. आपण प्रयत्न करीत राहावे, फळ मात्र निसर्गावर सोडून द्यावे. चांगल्या गोष्टी पेरत जाव्या. निसर्ग नियमानुसार फळ मिळतेच. आपल्या कार्याची कक्षा सुद्धा निश्चित करावी. हे जग क्षेत्रनिहाय आपआपलं योगदान देण्याचं जग आहे. म्हणजे कामाची वाटणी करताना सर्व काही मीच करेल हा अट्टाहास करणं योग्य नसल्याचं त्यांना वाटतं. म्हणून मी पक्षीनिरीक्षण आणि त्यांच्या नोंदी हे क्षेत्र निवडलं. आकाशाला गवसणी घालणाऱ्या पक्ष्याला गवसणी घालण सहज नक्कींच नाही. मात्र खगायनकार डॉ.अनिल पिंपळापुरे यांनी आपल अख्ख आयुष्य यातच वेचलंय. आपण त्यांच्याविषयीच जाणून घेऊया….!

विदर्भाला पक्षी आणि पक्षीनिरीक्षण या बाबतीत ओळख देणारे रमेश लाड्खेडकर आणि गोपाळ ठोसर यांच्या पिढीतला वारसा खर्या अर्थाने डॉ.अनिल पिंपळापुरे यांनी पुढे आणला. इतकच काय तर विदर्भातील पक्षी निरीक्षण चालवळीच्या मनोऱ्याला कळस यांनीच चढविला अस म्हटल्यास अतिशयोक्ती होणार नाही. डॉ.पिंपळापुरे यांच्या निसर्ग भ्रमणाची सुरवात बालवयातच झाली. अकोल्यात असतांना शालेय जीवनातच त्यांना हि आवड लागली. शाळेत असतांना सायकलीने फिरन त्यांना खूप आवडायचं. ते आपल्या सवंगड्याबरोबर अनेक ठिकाणी भटकंती करत असत. आजही त्या आठवणी सांगतांना सर भावूक होतात. शालेय, महाविद्यालयीन आणि दंतशल्यचिकित्सा शिकून स्वतची ओळख निर्माण करण्यात व्यस्त जरी असलो तरी निसर्गाने मला कधी एकट सोडल नाही. तो सतत माझ्या सोबत होता. दंतशल्यचिकित्सा म्हणून उपजीविका पदरी पडली असतांना आपल्या ‘जीविके’ला आयुष्य देत राहण सोप नाही. शारीरिक कणखरता आणि मानसिक शुद्धता हवी असेल तर आपण निसर्गाची मैत्री केलीच पाहिजे हेच यांच्या बोलण्यातून मला जाणवलं. निसर्गातील जैवविविधेतेचे अनेक धागे आहेत. यातला मला आवडलेला आणि महत्वाचा धागा म्हणजे पक्षी होय अस ते अभिमानाने सांगतात.

मानव आणि पक्षी यांचे सहसंबंध आताचे नसून ते पूर्वापारपासून चालत आलेले आहेत. विदर्भातील आदिवासीकडे असलेले परंपरागत पक्ष्यांचे ज्ञान अतिशय महत्वाचे आहे. पूर्वीच्या तुलनेत पक्षी निरीक्षकांची संख्या जरी वाढली आहे, तरी हे निरीक्षण फक्त छंदापुरते मर्यादित राहायला नको. हजार पक्षी निरीक्षक असतील तर त्यातील किमान २५ तरी पक्षीनिरीक्षक हे शाश्वत पद्धतीने तयार व्हायला हवेत. पक्ष्याच्या निरीक्षणामागे त्याचे घरटे, त्याचा अधिवास आणि त्यांचे संवर्धन अशा नोंदी आवश्यक आहेत. पक्षीशास्त्राला पारंपरिक ज्ञानाची जोड आवश्यक आहे. वरवर किंवा उथळपणे हा अभ्यास करून काहीही उपयोग होणार नाही. यासाठी परंपरागत ज्ञान असणाऱ्या लोकांसोबत मिसळून राहल्यास खरे ज्ञान संपादन करता येईल. यासाठी पक्षीकेंद्रित व्याख्यानमाला, कार्यशाळा, चर्चासत्र, मुलाखत यावर अधिक भर देणे आवश्यक आहे. त्यासाठी देशभरातील पक्ष्यांवर काम करणाऱ्या लोकांना सहभागी करून घेणे आवश्यक असल्याचे त्यांना वाटते. पक्षी निरीक्षण आणि संवर्धन यासाठी छोटेछोटे प्रयोग करण्यात यावेत. पक्षीनिरीक्षक व पक्षी अभ्यासकांना खुल्या मनाने मार्ग दाखवण्याचे काम करणे आवश्यक आहे.

दुर्दैवाने आपल्याकडे त्यावर मेहनत घेणारी मंडळी कमी आहे. पण विदेशी संशोधकासारखी झोकून काम करण्याची पद्धत आता आपल्याला आत्मसात करायला हवी. पक्ष्यांचे अधिवास आणि प्रजाती अशाश्वत विकासामुळे नाश होण्याची गती वाढली आहे. त्याला वेसन आपनच घातली पाहिजे. आमच्या काळात पक्षी अभ्यासासाठी फारसे स्रोत नव्हते, आता ते उपलब्ध आहेत. अभ्यास, जनजागृती वाढत आहे, आणि ही जमेची बाजू आहे. त्याला फक्त एक दिशा देण्याची गरज असल्याचे त्यांना वाटते. वाढत्या वयात शारीरिक त्रासापासून वाचायचे कसे आणि स्वस्थवर्धक जीवन जगण्याची किल्ली मला पक्षीनिरीक्षन या छंदातून मिळाली असल्याचं सर आवडीने सांगतात. अनिल म्हणजे वायू, हवा किंवा पवन होय. गरुड जसा उंच झेप घेऊन स्वतःला हवेच्या कुशीत सोपवुन वाऱ्याच्या वेगाचा उपयोग करून उडतो.  तसेच आपल्या डॉ.अनिल यांनी सुद्धा गरुडाप्रमाणे उंच झेप घेतली. एखाद्या तरुणालाही लाजवेल इतकं तेजोमय व्यक्तीमत्व पाहून कुणीही भारावेल. डॉ.अनिल हे तेजोवलंय अनेक तरुण पक्षीमित्रांना ऊर्जा देणारं आहे. यातून आजही अनेक तरुण ऊर्जा घेत आहेत. तरुणांच्या गळ्यातला ताईत बनलेले डॉ.अनिल पिंपळापुरे आजही तीच ऊर्जा घेऊन जगतात. निस्वार्थ आणि निखळ व्यक्तिमत्त्व हल्ली दुर्मिळच, डॉ अनिल पिंपळापुरे हे याच माळेतील रुद्राक्ष आहेत. त्यांच्या पुढील कार्यासाठी आपण त्यांना शुभेच्छा देऊया….! ही शुभेच्छा त्यांना आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली तयार होणाऱ्या नव्या पिढीला संजीवनी देणारी ठरेल.

@ यादव तरटे पाटील

     वन्यजीव अभ्यासक, 

     दिशा फाउंडेशन, अमरावती

      संपर्क- ९७३०९००५०० 

     disha.wildlife@gmail.com

     www.yadavtartepatil.com

 

Yadav

Auther is a Member of Maharashtra State Board for Wildlife, wildlife conservationist, eminent nature activist, columnist & working for wildlife, environment & for tribal youth since 20 years. He is also working for anti-poaching, green administration & green journalism. He is also Founder of Disha foundation, Amravati based Organisation.

Recent Posts

तरुणांनो वन्यजीवांची हाक ऐका…..!

वन्यजीव संवर्धन ही सर्वच देशातील नागरिकांची प्राथमिक जबाबदारी आहे. विशेष करून तरुणांची यात महत्वाची भूमिका…

4 years ago

मी चष्मेवाला

मी आहे चष्मेवाला..! पण मी चष्मा नाही लावत बर का..? आणि हो मी ‘मामा की…

4 years ago

वेडा नसलेला ‘वेडा राघू’

छोटा पाणपोपट हा पक्षी वेडा राघू नावानेच अधिक परिचित आहे. या पक्ष्याच आपण 'वेडा राघू'…

4 years ago

फ्रेंडशिप डे निसर्गाचा…!

एका गावात एका मुलीला उडणारे पक्षी खूप आवडायचे, पण एक दिवस राजा अचानक पक्षी मारायचं…

4 years ago

Beauty with Poison…!

Are butterflies poisonous? You will be perplexed if you ask this question. We know that…

4 years ago

सौंदर्यात दडलंय विष…!

फुलपाखरे विषारी असतात का.? हा प्रश्न विचारला तर तुम्ही नक्कीच बुचकळ्यात पडाल. साप, विंचू व…

4 years ago