पालींचा पालक : डॉ. वरद गिरी
कर्नाटकातील ‘अंकली’ या लहानश्या गावातून आलेल्या या तरुणाला दहावीत फक्त बावन्न टक्के, बारावीतही जेमतेमच गुण..! बि.एस.सी. नंतर कीटकशास्त्रात स्नातकोत्तर पदवी पूर्ण होईपर्यंत त्याला आपल्या वाटचालीचा थांगपत्ताही न लागावा असाच हा किस्सा आहे. भविष्यात जागतिक ख्यातीचा सरीसृपतज्ञ होईल याची साधी कल्पनाही त्याच्या डोक्याला शिवली नाही. प्राणीशास्त्रात आचार्य पदवी पूर्ण करून बि.एन.एच.एस. या भारतातील नामांकित संस्थेत काही काळ नोकरी करेल. एन.सी.बि.एस. (National Centre for Biological Science) मध्ये शास्त्रज्ञ म्हणून काम काय करेल. अन पाहता पाहता हा अवलिया भारतीय सरीसृपांचे जग समृद्ध करेल. हे सगळे काही त्याला आणि जगालाही अनाकलनीय आहे. जेंव्हा त्याच्या या प्रेरणादायी प्रवासाकडे मी पाहतो तेंव्हा अक्षरशः अंगावर शहारे आल्याशिवाय राहत नाही.
पाली, साप, सरडे अन बेडूक यांच्यासाठी जगणारं ‘वरद भगवान गिरी’ नावाच हे रसायन जरा आगळेवेगळचं आहे. निर्मळ, निखळ व अस्सल मैत्रीचा ओलावा असेलला वरद जेंव्हा बोलतो आपल्याशी तेंव्हा आपण तल्लीन होऊन त्याला ऐकतो. ‘आपण आज आहोत, उद्या नाही. निसर्ग इथेच आहे. निसर्ग शाश्वत आहे.’ हे वाक्य तो नेहमीच उच्चारतो. यातून आपण आपले पाय जमिनीवर राहून कस जगायचं याची प्रचीती येते. जगण्यातला साधेपणा आणि वागण्याचा हा जमिनीवरचा सूर अतिशय मनभावक आहे. कायम मातीत जगणारा, मैत्री जपणारा शास्त्रज्ञ म्हणून डॉ. वरद गिरी यांचा मी नामोल्लेख करेल. डॉ. वरद गिरी म्हणजे सरीसृपांचा व उभयचरांचा चालता फिरता कोषच आहे. गिरी या आडनावाप्रमाने त्यांच कामही शिखरासम उंची गाठनार असच आहे. आपल्या लहानपणच्या जेमतेम परिस्थितीतल्या आठवणी अन महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण करून केवळ पाच हजार रुपये महिन्याच्या पगारावर नोकरी केल्याची आठवण सांगताना वरद भावूक होतो. यशाच उत्तुंग शिखर गाठूनही पाय जमिनीवर असलेला हा माणूस हेवा वाटेल असाच आहे. पश्चिम घाटात देवगांडूळ (Caecilians) शोधनाऱ्या वरद गिरी यांच्यात मला तेंव्हा देवच दिसतो. आपणही त्याच्या सहवासाने धन्य झाल्याची भावना मनात येते. माणस जोडण आणि त्यांच्यात मनापासून रमण ही खास शैली आहे. म्हणूनच तो नेहमी म्हणतो की, अरे मित्रा ही माणसच आपली खरी कमाई आणि संपती आहे.
सन २०१६ मध्ये डॉ.वरद गिरी अमरावतीला आले होते. म्हणून मी माझ्या स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांना एक नवीन मेजवानी द्यावी असे ठरवले. स्पर्धा परीक्षेच्या वर्गात ‘वरद’ स्वताला सांगताना विद्यार्थी साडेतीन तास निवांत ऐकत होते. डॉ. वरद गिरी हा तरुण फक्त शास्त्रज्ञच नसून उत्तम वक्ता देखील आहे हे मला तेंव्हा नव्याने कळलं. कारण त्या साडेतीन तासात वेगळेच वरद गिरी मी अनुभवलेत. ‘माय टुडेज स्पीच विल बि इन्स्पिरेशनल फॉर युवर स्टुडंट..!’असा तो म्हणाला होता. आचार्य पदवी (पी.एच.डी.) पूर्ण केल्यानंतरही हा माणूस स्वतःच्या नावापुढे कधीही डॉक्टर लावत नाही. ‘स्वताच्या नावापुढे डॉक्टर ही उपाधी न लावणारा मी पाहिलेला हा पहिला माणूस आहे.’
@ यादव तरटे पाटील
दिशा फाउंडेशन, अमरावती
संपर्क- ९७३०९००५००
वन्यजीव संवर्धन ही सर्वच देशातील नागरिकांची प्राथमिक जबाबदारी आहे. विशेष करून तरुणांची यात महत्वाची भूमिका…
छोटा पाणपोपट हा पक्षी वेडा राघू नावानेच अधिक परिचित आहे. या पक्ष्याच आपण 'वेडा राघू'…
एका गावात एका मुलीला उडणारे पक्षी खूप आवडायचे, पण एक दिवस राजा अचानक पक्षी मारायचं…
Are butterflies poisonous? You will be perplexed if you ask this question. We know that…
फुलपाखरे विषारी असतात का.? हा प्रश्न विचारला तर तुम्ही नक्कीच बुचकळ्यात पडाल. साप, विंचू व…