सर्पप्रज्ञाचक्षु : अक्षय खांडेकर
जन्मताच आपल्याला दृष्टि नसते. ती यायला काही दिवस लागतात. निसर्गात मात्र असे अनेक वन्यजीव आहेत की त्यांच्या वाट्याला कायमचं अंधत्व असतं. त्यांच जगणंच मुळात गुढ असतं. अस चमत्कारी विश्व उलगडण त्याहूनही कठीण नाही का…? मात्र एक तरुण अश्या सजीवांची दृष्टी बनून त्यांच विश्व उलगडण्याचा प्रयत्न करतो आहे. हे सगळं तुम्हाला चमत्कारिकच वाटतं असेल ना…! मात्र सांगली जिल्ह्यातील आटपाडी तालुक्यात हीवतड गावात जन्म घेणाऱ्या या तरुणाने हे शक्य करून दाखवलंय. अनभिज्ञ असलेल्या समाजाला एका उपेक्षित सापाची ओळख करून देण्याच शिवधनुष्य त्याने पेललं आणि तो त्यात यशस्वी सुद्धा झालाय. आंधळ्या सापाचा शोध लावणारा तरुण म्हणून आज त्याची ओळख सांगतांना प्रसिद्ध सरीसृपतज्ञ डॉ.वरद गिरी यांना अभिमान वाटतो. ‘माझ्या गावात बस नाही, गावाला तिन्ही बाजूने डोंगरवेढा, जगाचा जिथे अजिबात संपर्क नसतांना आज हेच गाव जगाच्या नकाशावर आलंय. अस सांगतांना अक्षय खुपच भावूक होतो. इयत्ता चौथीत असतांना एक दिवस मी मित्रांबरोबर खेकडे, मासे पकडायला एका ओढ्यात गेलो. पाण्यात उतरताच मी बिळात हात टाकला. हात टाकताच माझ्या हाताला काहीतरी मऊ मऊ लागलं. मला भयंकर आनंद वाटू लागला. जसा माझा हात पाण्याबाहेर आला तसे माझे मित्र सुसाट वेगाने पाण्याबाहेर पळाले. हे पाहून सुरवातीला मला हसू आल. मी तर फक्त मासा पकडला आणि हे वेडे दूर का पळतायेत. हे सांगतांना अक्षय प्रचंड आनंददायी वाटतो. कोवळ्या हातांना झालेला सापाचा तो पहिला स्पर्श किती निष्पाप असेल याची कल्पना आपण करू शकतो. साप पकडण हे गावासाठी एक मोठ भव्यदिव्य असतांना सगळ्या गावात माझं कौतुक झालं. मात्र आपल्या मुलाने काहीतरी वेगळं कराव अस माझ्या घरी वातावरन नव्हत. घरी माहिती पडल तर मला हे करायला मिळणार नाही म्हणून मी चोरून साप पकडू लागलो अस अक्षय खांडेकर तल्लीन होऊन मला त्याच्या आठवणी सांगत होता.
कोवळ्या हातांवर अलगद आणि लीलय खेळणारी सरीसृपसृष्टी पुढे हेच हात समृद्ध करतील याची कल्पनाही कुणाला आली नसावी. हळहळू सापांच्या भीतीची जागा आता कुतुहुलाने घेतली. पुढे गावातील शिकार करणाऱ्या मुलांशी माझी ओळख झाली. जंगलात भटकणे, शिकाऱ्यांसोबत फिरणे हा माझा नित्यनेम असतांना अचानक मला गाव सोडव लागल. वडील व्यवसायाने शिक्षक असल्याने शिकाऱ्यासोबत फिरणे त्यांना आवडत नव्हते. लोकं त्यांच्याकडे तक्रार करायचे की तुमचा मुलगा एका शिक्षकाचा मुलगा असूनही शिकार करतो. तर दुसरीकडे शिकारी मात्र माझे कौतुक करायचे. घोरपड, ससे पकडणे हेच अक्षयच विश्व बनलं. दगडाखालचे विंचू आणि पालीं पकडायचा मी सपाटाच लावला होता. निसर्गातले हे सगळे उपेक्षित घटक मला खुणावतात. शिकार करणारा मी पुढे मोठा शिकारी होणार अस भाकीत करणाऱ्या लोकांनी आता माझं काम पाहून तोंडात बोट टाकली आहेत. गावकारयांनी वेड्यात काढलेला अक्षय ते थेट आताचा सरीसृपतज्ञ अक्षय खांडेकर असा प्रवास तरुणांना प्रेरणादायी ठरला आहे. अक्षयच भविष्य उज्वल व्हावं म्हणून वडिलांनी अक्षयला गावातून बाहेर काढल खर पण मात्र अक्षयच्या मनात वेगळेच स्वप्न रंगू लागले होते. जंगल भटकणे आणि यातच आपलं आयुष्य गेलं पाहिजे अस त्याला वाटायच. लहानपनाची आठवण सांगतांना अक्षय आपल्या बालपणात हरवतो. तो सांगतो की मी लहानपणी पाल पकडली की मुले मला हात लावत नव्हते, तू आम्हाला हात लाऊ नकोस, आमच्या पासून दूर हो, तुला आम्ही शिवणार नाही. मात्र अक्षय कायम सरीसृपांच्या संपर्कात राहायचा. अक्षय नववीत असतांना ग्रंथालयात व्यकंटेश माडगूळकर यांची पुस्तक वाचू लागला. आपलं स्वताच आयुष्य तो त्यांच्या आयुष्यात पाहू लागला. अक्षयने डॉक्टर किंवा अभियंता व्हावं अस बाबांना वाटायचं. त्यालाही वाटायचं की आपण विज्ञानच घेतलं पाहिजे. इथे बाबांचा आणि त्याचा उद्देश मात्र वेगळा होता. शिकून मोठ व्हावं, गरिबीत दिवसं काढल्यामुळे आपल्या मुलाने मन लाऊन अभ्यास करावा अस वडिलांना वाटायचं. म्हणून बारावीनंतर अक्षय जिल्ह्याच्या ठिकाणी आला. पण येथेही अक्षय इंटरनेटवर प्राण्यांची नाव शोधू लागला. इंटरनेटवर प्राण्यांची माहिती गोळा करणे म्हणजे वन्यजीवांच विश्वच बनलं. पुढे अक्षयने देहरादूनच्या भारतीय वन्यजीव संस्थेतून एम.एस.सी.पूर्ण केलं.
अक्षयला आपल्या बालपणीचे स्वप्न सांगतांना स्वप्नात रंगतो. आठवी ते पदवी पर्यंत वन्यजीव संशोधन हेच त्याच स्वप्न होतं. अक्षय बी.एस.सी.ला असतांना डॉ. वरद गिरी यांच नाव त्याला इंटरनेटवर सापडलं. स्वप्नील पवार आणि डॉ. वरद गिरी यांच्या प्रेरणेने माझ्यातल्या संशोधन वृत्तीने कळस रचला. डॉ. वरद गिरी यांनी मला चक्क स्वतच्या घरी राहायला बोलावल. माझ्यातली तळमळ त्यांनी नेमकी हेरली आणि मला एक महिना घरी राहायण्याच भाग्य लाभलं. यातच माझ्या आयुष्याला खरी कलाटणी मिळाली असल्याच अक्षय मोठ्या अभिमानाने सांगतो. अक्षयने आजवर २० हून अधिक नवीन प्रजातींचा शोध लावलाय. पुढील दोन वर्षात अजून किमान २५ तरी नवीन प्रजाती येतील अस अक्षय सांगतोय. या संशोधनात स्थानिक लोकांकडून अधिक शिकयला मिळाल्याच तो सांगतो. एकेकाळी बालपणी मला बदनाम केलेल्या समाजासमोर उभं राहतांना बाबांना वाईट वाटायचं आज त्याच बाबांना माझा अभिमान वाटतो. हे सांगताना अक्षय मला अधिक भावतो. अक्षयचे हिरवे डोळे अजूनही अधिकाधीक समृद्ध होतील. अवघ्या पंचविशीत आंतरराष्ट्रिय स्तरावर कीर्ती करणाऱ्या अक्षय खांडेकरांना निसर्गाच्या हिरव्या खजीन्यातील नवनवीन प्रजातींचा शोध लागतच राहील असा विश्वास वाटतो.
@ यादव तरटे पाटील
वन्यजीव अभ्यासक,
दिशा फाउंडेशन, अमरावती
संपर्क- ९७३०९००५००
वन्यजीव संवर्धन ही सर्वच देशातील नागरिकांची प्राथमिक जबाबदारी आहे. विशेष करून तरुणांची यात महत्वाची भूमिका…
छोटा पाणपोपट हा पक्षी वेडा राघू नावानेच अधिक परिचित आहे. या पक्ष्याच आपण 'वेडा राघू'…
एका गावात एका मुलीला उडणारे पक्षी खूप आवडायचे, पण एक दिवस राजा अचानक पक्षी मारायचं…
Are butterflies poisonous? You will be perplexed if you ask this question. We know that…
फुलपाखरे विषारी असतात का.? हा प्रश्न विचारला तर तुम्ही नक्कीच बुचकळ्यात पडाल. साप, विंचू व…