व्यक्ती वाईट नसतोच मुळात, मात्र व्यक्तीवर किंवा व्यवस्थेवर प्रवृत्ती जेंव्हा कुरघोडी करते, तेंव्हा मात्र ते अपेक्षेप्रमाणे वागत नाही. तेंव्हाचं सच्चे सेवक दुर्लक्षित होतात. हे कटू जरी वाटत असल तरी वास्तव आहे. पदाच काय पडल हो कुणाला..? काम करतोय ना तो..! ते अधिक महत्वाच आहे. अस वाक्य कानी पडतांनाच चक्क त्याच पदाची लायकी दाखवत जेंव्हा ही व्यवस्था पाय ओढते, तेंव्हा मात्र भावना अनावर होतात. बेंबीच्या देठापासून जोर लाऊन काम करणारी माणस हल्ली दुर्मिळच…! मात्र अश्यांच्या पदरी कायम निराशाच येते असाही एक प्रघात आज समाजमनात खोलवर जिरलेला आहे. अश्या घटनामुळे मात्र तो अधिक पक्का होत जातो. त्यात अश्या कलंदर व सेवेसाठी सदैव तत्पर असणाऱ्या वननायकांच्या सेवेचा उपयोग व्यवस्थेला जर निरंतर घेता येत नसेल, तर हे केवळ व्यवस्थेच दुर्दैवच नाही तर त्या वनसेवकाचही दुर्दैव म्हणावं लागेल. कायदा, नियम व परिपत्रकावर चालणारी ही व्यवस्था हवी तेंव्हा लवचिक, आणि वाटते तेंव्हा ताठर होते हे सर्वश्रुत आहे. मर्जीतल्या सेवकांना लवचिक आणि गैरमर्जीतल्या सेवकांच्या बाबतीत ताठर असे चित्र उभे होते. अस असतांना त्या व्यक्तीला तर त्रास होतोच, पण जोमानं उभं झालेलं काम देखील प्रभावित होते, हे वास्तव नाकारून चालत नाही. वन्यजीव व पर्यावरण संवर्धनाचा हेतू भावनिक होऊन सफल होत नाही. शासन व प्रशासन देखील भावनेला सप्रमाण मानून चालविल्या जाऊ शकत नाही. वास्तव व व्यावहारिक दृष्टीकोन त्यात असतोच. मात्र अश्यातच एखाद्याला दुधातली माशी जशी काढावी तस जेंव्हा ही व्यवस्था फेकून देते, तेंव्हा त्यांना काय वाटत असावं…? याची कल्पना तोच करू शकतो ज्याच्यावर हे प्रयोग होतात. अमरावती जिल्ह्यातील परतवाडा येथे कार्यरत वनसेवकाच्या भावना अनावर होतात तेंव्हा त्याचे डोळे पाणावतात.
दि. २० जून २००८ मध्ये चिखलदरा वन परिक्षेत्र कार्यालयात चतुर्थ श्रेणी पदावर रुजू झालेल्या परीक्षित डंभारे यांची ही कथा आहे. जंगलाला वणव्यापासून मोठा धोका असतो. अश्यावेळी जाळरेषा व रस्त्यावरील कचरा उन्हाळ्यात नियमितपणे काढावा लागतो. परीक्षित यांनी कोहा व चिखलदरा येथे सेवा देत असतांनाच रस्त्यावरील ही पसरलेली पानगळ हटविण्याची विशेष शक्कल लढवली. युक्ती अतिशय साधी असली तरीही लक्ष्यात कुणाच्या आली नाही. ट्रक्टरला मागे झाडाची फांद्या बांधून फिरवील्यास पाने बाजूला होतात. आणि वनवा एकीकडे दुसरीकडे पसरत नाही. ब्लोअर किंवा मजुरासाठी खर्च होणारा पैसा ही शक्कल लावल्याने वाचला. सन २०१० मध्ये राज्यात पहिल्यांदा मेळघाटातील वैराट या गाभा क्षेत्रात पहिला सोलर स्प्रिंकलर यांनीच बनविला. यामुळे भर उन्हाळ्यात जनावरांना २४ तास प्यायला पाणी आणि हिरवा गवत उपलब्ध झालं हे सांगताना परीक्षित खूप आनंदी होतो. सन २०११ मध्ये तत्कालीन वनपरीक्षेत्र अधिकारी श्री. बेदरकर यांच्या मार्गदर्शनात व राजेश घागरे यांच्या सोबत मेळघाटात पहिल्यांदा ट्रॅप कॅमेराच्या तंत्राचा श्रीगणेशा यांच्यात हातून झाला. हे तंत्रज्ञान नवीन असल्याने याची जबाबदारी घ्यायला कुणी तयार नव्हत, अश्यावेळी यांनी पुढाकार घेतला. विशेष म्हणजे यावेळी मेळघाटच्या इतिहीसात पहिल्यांदा एकत्र तीन वाघांचे फोटो मिळाल्याची घटना सांगताना परीक्षितचा चेहरा भावूक होतो. अशातच एक प्रसंग खूप भीतीदायक आणि अविस्मरणीय असल्याच परीक्षित सांगतात. त्यांच्या अर्धानिगी सौ. सुवर्णा ह्या स्वतः निसर्गप्रेमी आहेत. त्यांना सोबत घेऊन ते एकदा ‘ट्रॅप कॅमेरा’ तापसणी करायला गेले. सायंकाळची वेळ होती, ट्रॅप कॅमेराच्या जवळ जाताच त्यांना वाघाच्या गुरगुरण्याचा आवाज आला. क्षणात वाघाने यांच्याकडे धाव घेतली. यांनाही पळण्याशिवाय पर्याय नव्हता. ही आठवण सांगतांना आजही अंगावर काटे येतात. पत्नी सुवर्णासोबत घडलेला हा प्रकार जीवावर बेतणारा असला तरी तो ‘सुवर्णा सोबतचा एक सुवर्णक्षण’ असल्याच त्यांना वाटतं. अश्या अनेक गोष्टी त्यांच्या आठवणीतल्या कप्प्यात आजही साठवून आहे. स्वतः केवळ बी.ए. ची संपादन करून अपघात झाल्यामुळे पुढे पॉलीटेक्निक पदविका अर्धवट सोडावी लागली. अस असतांनाही इतकं तांत्रिक ज्ञान असणं हे वेडेपणा शिवाय येऊ शकत नाही. हाच वेडेपणा जेंव्हा एखाद्या विधायक कार्यात लागतो तेंव्हा वन व्यवस्थेला याचा प्रचंड उपयोग होतो. यातून लाखो करोडोच नाही तर त्याहून अधिक अगणित अश्या वन्यप्राण्यांचे संवर्धन आणि माणसांचेही संवर्धन होते. जेंव्हा जेंव्हा वन विभाग या यंत्रणेला अत्याधुनिक तंत्रज्ञानाची गरज भासली तेंव्हा तेंव्हा या पठ्याने नवनवीन प्रयोगातून आपलं कौशल्य आजवर सिद्ध केलं आहे.
भारतातील पहिल्या वाईल्ड लाईफ क्राईम सेलच्या निर्मितीत यांनी केलेली कामगिरी उल्लेखनीय ठरली. तत्कालीन उपवनसंरक्षक रविंद वानखडे (भा.व.से.) व तत्कालीन सहायक वनसंरक्षक विशाल माळी (म.व.से.) यांच्या मार्गदर्शनात यांनी ही धुरा लीलया पेलली. जे काम एखाद्या उच्च दर्जाच्या व तांत्रिकरित्या प्रशिक्षित अधिकाऱ्याच्या पातळीचे आहे ती सगळी कामे परीक्षित करण्यात पटाईत आहे. मेळघाट व्याघ्र प्रकल्पाच्या चमूने विशाल माळी यांच्या नेतृत्वात जेंव्हा ढाकणा वाघ शिकार प्रकरणाचा छडा लावला तेंव्हा हेच तंत्रज्ञान अधिक उपयोगी पडलं. यातुनच परतवाडा येथे एका स्वतंत्र ‘वाईल्ड लाईफ क्राईम सेल’ जेंव्हा गरज भासू लागली. एक सहाय्यक वनसंरक्षक दर्जाचे अधिकारी आणि एक थेट चतुर्थ श्रेणी कर्मचारी परीक्षित डंभारे यांनी यात आपला जिव ओतला. या सेलचे नियमन करायला सर्व तांत्रिक पाठबळ परीक्षित यांनी उभं करण्यात आपलं कौशल्य पणाला लावलं. हे सगळं करतांना उपवनसंरक्षक रविंद वानखडे, उपवनसंरक्षक उमेश उदल वर्मा आणि सहायक वनसंरक्षक विशाल माळी यांनी मला संधी देऊन माझ्यासाठी दार खुल केलं, म्हणूनचं हे सगळं शक्य झाल्याच ते सांगतात. वाढत्या वाघांच्या शिकारी आणि अपुऱ्या सुविधा आणि तंत्रज्ञानाची कमतरता असल्यामुळे शिकाऱ्यावर वचक बसने आवाक्याबाहेर झालं होतं. पोलीस विभागाला याबाबत विश्वासात घेऊन मोबाईल सि.डी.आर. डेटा काढावा लागतं असे. यामध्ये भरपूर वेळ जात होता. याचा परिणाम इतर बाबींवर होऊन कायदेशीर व न्यायिक प्रकरनांना गती देता येत नव्हती. या वेळखाऊ कामकाजामुळे शिकाऱ्यांना ही नामी संधी उपलब्ध होत होती. यावर विशाल माळी यांच्याच नेतृत्वात परीक्षित डंभारे यांनी वेगवेगळ्या कंपन्यांच्या अधिकाऱ्यांशी व शासन स्तरावर चर्चा व मागणी करून पहिल्यांदाच पोलीस विभागाच्या व्यतिरिक्त स्वतंत्र ‘सि.डी.आर.’ तंत्रज्ञान प्रणाली वन विभागाकडे उपलब्ध करून घेण्यात यश संपादन केलं. यासाठी एकट्याने त्यांनी दिल्ली व पुणे येथे अनेक वाऱ्या केल्या.
भारतातील पहिली ‘ई-अॅडव्होकेट’ सेवा सुरु करण्यातही परीक्षित यांचा मोलाचा वाटा राहिला आहे. या ‘ई-अॅडव्होकेट’ सेवेत कायद्याच्या कोणत्याही कलमाची माहिती हवी त्या ठिकाणी व हवी त्यावेळी वनरक्षकासकट इतरांनाही सहज उपलब्ध झाली होती. यात जसगीत सिंग यांची खूप मदत झाली असून वन विभागावर त्यांचे हे कायमस्वरूपी उपकार असल्याचे त्यांना वाटते. यामध्ये परीक्षित डंभारे यांनी थेट दिल्ली येथे भारत सरकारच्या केंद्रीय दुरसंचार विभागात जाऊन सादरीकरण केल्याने ही सेवा नंतर मोफत उपलब्ध झाली हे विशेष आहे. यामध्ये संपूर्ण भारतभर केवळ एका वर्षात तब्बल एकूण ५६ लाख संदेश देता आले. इतकंच काय तर, भारतात प्रथमच ऑनलाइन पद्धतीने घरबसल्या बुकिंग करून वन्यप्राणी गणनेत सहभागी होता आल. ‘वन्यप्राणी गणना एका क्लिकवर’ या नियोजनाची धुरा परीक्षित यांनीच सांभाळली होती. अश्या अनेक तंत्रज्ञान कौशल्यात हातखंडा असेलेले परीक्षित डंभारे यांना वेगवगेळ्या पुरस्काराने आजवर गौरविण्यात आलेल आहे. सन २००९ मध्ये मेळघाट फाउंडेशनचा पुरस्कार, सन २०१३ मध्ये प्रधान मुख्य वनसंरक्षक नागपूर या कार्यालयाचा पुरस्कार, सन २०१३ मध्ये मेळघाट व्याघ्र प्रकल्पाचा उत्कृष्ठ कर्मचारी पुरस्कार, सन २०१४ मध्ये वन विभागाचे राज्यस्तरीय सुवर्णपदक, सन २०१४ मध्ये सँचुरी एसिया अर्थ हिरो अवार्ड, सन २०१५ मध्ये भारत सरकारच्या ‘वाईल्ड लाईफ क्राईम ब्युरोच्या पुरस्कारासह आदी पुरस्काराने त्यांना आजवर सन्मानित करण्यात आलं आहे. परीक्षित डंभारे सध्या प्रादेशिक वन विभाग अंतर्गत परतवाडा येथील लॉगिंग युनिट येथे कार्यरत आहे. या तंत्रवेड्या हिरव्या शिलेदाराला आपण शुभेच्छा देऊया…!
@ यादव तरटे पाटील
वन्यजीव अभ्यासक,
दिशा फाउंडेशन, अमरावती
संपर्क – ९७३०९००५००
disha.wildlife@gmail.com
सर thank you …… तुमच्यामुळे मला डंभारे सरांची प्रत्यक्ष भेट घेता आली होती…..
धन्यवाद ऋषी
अभिमान आहे अश्या वह् शीलेदारांचा.. अशा सर्वांना मानाचा मुजरा
??
कर्तव्यनिष्ठतेला कुठलाही वर्ण नसतो, जात नसते, पत नसते.. ती निर्भेळ आणि निरामय असते…. ती फक्त ध्येय्यात गुरफटलेली आणि निर्मळ आणि कुठल्याही बेगडी श्रृंगाराविना नटलेली असते.. अशा कर्तव्यनिष्ठतेला लक्ष लक्ष सलाम…????????
प्रिय सर
खूप खूप धन्यवाद
परीक्षित भाऊ डंभारे यांचे कार्य इतरांसाठी आदर्श आहे. त्यांच्या कार्यातून आणि प्रयत्नांतून नक्किच शिकले पाहिजे. एरवी हे कार्य जगाला माहीत होणे कठीण होते, पण हे तुमच्या मुळे शक्य झाले यादवभाऊ.???
परीक्षित भाऊ डंभारे यांच्या सारखे लोकं फार कमी पहायला मिळतात. यांचे कार्य इतरांसाठी आदर्श आहे. त्यांच्या कार्यातून आणि प्रयत्नांतून नक्किच शिकले पाहिजे. एरवी हे कार्य जगाला माहीत होणे कठीण होते, पण हे तुमच्या मुळे शक्य झाले यादवभाऊ. छान लेख लिहला आहे. संवर्धन कार्यात काम करणाऱ्या अश्या हातांना सलाम. ????
प्रिय प्रतापराव
आपलं कर्तव्य आहे हे,
धन्यवाद
संवर्धन कार्यात काम करणाऱ्या अश्या हातांना सलाम. ????
नावातच परिक्षित असलेले आमचे मोठे बंधू……. मानसाच काम बोलत त्याची जात,वर्ण,उंची,पैसा.हा सर्व बाजूला असतो….. मानसाच काम बोलत पद चतुर्थ असो पन कामगीरी तर सुपर वर्ग 1 पेक्षा हि मोठी आहे…… मानसाच्या डोक्याचा उपयोग घ्या…..जो काम करतो त्याचे विरोधक खुप असतात आजूबाजूला पन विरोधकांच्या मागे लागून काय काम करने सोडून दायायचे नसते का अजून जोमाने कार्याला लागायचे असते……आपल्या चांगल्या कार्याबद्दल नोंद वरचा ठेवतो…..खालच्यानी ठेवली नाही तरी चालते…… ….भाऊ आपल्या कार्याला व वनसेवेला सलाम…..जय हिंद…. तरटे गुरुजी संच्च्या वनसेकाला लेखनीत उतरवले आभार आपले….मनस्वी आभार….जय हिंद….
जय हिंद साहेब
धन्यवाद
खरंच तंत्रवेडा वनसेवक यांची कर्तबगारी वाखाण ण्याजोगी आहे. मुळात मी यवतमाळ वनवृत्तात पांढरकवडा वनविभागात कार्यरत असताना मी परीक्षित डंभारे याचे नाव व तंत्र ऐकले होते . आता परतवाडा येथे असल्यामुळे तयाची कार्यशैली जवळून पाहत आहे . यादव सर आपण सुंदर व समर्पक शब्दात छान मांडणी केली आहे ……………..
धन्यवाद साहेब
Thanks sir, tumchmule ashya exparts chi information milte Ani tyncha itka nai pan apan hi kahi karava asa vatta, manapasun dhanyawad Ani Parikshit sirana salute
Yadav ji khupch Chan article aahe , mi swata Parikshit barobar Kam kelele aahe , wildlife Crim ani Aani Tapas prakriya babat khupch Chan Kam aahe .
Sir Thank you very much. I also work with him.
खूप सुंदर लिखाण ,या लिखाणाच्या माध्यमातून परिक्षित डंभारे यांना मानाची सलामी दिली आहे. खऱ्या अर्थाने परीक्षित भाऊंची महाराष्ट्र शासनाला झालेली मदत आणि त्यांच्या अथक परिश्रमाने समाजासाठी ,देशासाठी, जंगलाला वाचवण्यासाठी केलेली अतिशय मोलाची कामगिरी महत्त्वाची ठरते. यादव तुझ्या माध्यमातून ही सर्वांपर्यंत पोहोचते तुझे खूप खूप अभिनंदन, तुझ्या लिखाणाला अशीच धार मिळो हीच प्रार्थना.
According to me there are lots of difference between the terms…..i.e.Education(Degree) and Educated ……this two are more precious word…….and what I want to say is clear by this Article………Thank u TARTE Sir to Meet us one of the Legendary Person …….Res. Dambhare Sir…..salute to u Sir…… …Nature BLESSED YOU….
Thanks a lot madam
regards
These positive inspirations build personality, built department …. Great writing great work sirji
Thank you very much. Sudhir Saheb
आणखी काही मनातले बोलायचे आहे म्हणून सहज या माध्यमातून पोहोचविण्याचा प्रयत्न करतो. वन खात्यामध्ये असे कितीतरी तृतीय श्रेणी कर्मचारी आहेत की ते कामाच्या आणि अनुभवाच्या भरोशावर खूप चांगले काम करतात. तरीही त्यांना महाराष्ट्र शासन प्रमोशन देत नाही किंवा त्यांना त्याच पदावर बरेच दिवस काम करावे लागते. अशावेळी शासनाने थोडीशी आपली स्ट्रॅटेजी बदलवून उच्च दर्जाचे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना प्रमोशन द्यावे, त्यांच्या कामाचा वेग वाढवावा आणि त्यांना नेहमी प्रोत्साहन द्यावे असे वाटते. कारण ही माणसे नोकरीसाठी काम करत नाहीत तर खऱ्या अर्थाने देशासाठी समाजासाठी आपली नैतिक जबाबदारी समजून काम करतात म्हणून शासनाने त्यांच्याकडे जरूर लक्ष द्यावे ही विनंती धन्यवाद
अगदी बरोबर श्रीकांत, या लेखाच्या सुरवातीला उलेख केल्याप्रमाणे अश्या कामकरी सेवकांच दमन करते ही व्यवस्था, असो तुझ्या मनासारख होवो यासाठी शुभेच्छा आणि प्रार्थना करुया.
नमस्कार सर,
परिक्षीत सरांचे अभिनंदन, शासकीय कामात एक वेडाच अशी कामगिरी करू शकतो. आपली कार्यशाळा असल्यास कळवावे.
Thank you very much. नक्की कळवतो आपला नंबर द्यावा कृपया.
खूप सुंदर लिखान सर… वनविभागात अशी माणसे आहेत याचा सार्थ अभिमान आहे . आम्हाला अश्या व्यक्तीनं कडून सदैव प्रेरणा मिळेल.
yess very true.thank you very much Madam.
Good article & thanks for bringing such unsung heroes of melghat into limelight, willing to meet him during next melghat visit, personally I feel that to get an opportunity to work for Melghat is itself an big award given by nature & bigger than any award given by human beings
Yess agreed
will meet with you with him. thank you very much.
Chan
Thank you
मोलाची कामगिरी करणा-या दुर्लक्षित कर्मचा-या अनमोल कामाला आपण प्रकाशात आणून आपण फार महत्वाचे काम केले आहे. आपणा दोघांचेही मनापासून अभिनंदन. शुभेच्छा.
आदरणीय गुरुजी आभार आणि धन्यवाद
2014 पदक वितरण कार्यक्रमात भेट झाली. खरोखरच डंभारे यांनी केलेले काम अतुलनिय आहे. वनविभागाचे खरे हिरो। Salute ???
Thank you very much.
यादव सर,
सर्वप्रथम आपले मनापासून धन्यवाद..!!
आपण मनापासून काम करणाऱ्या एका ध्येयवेड्या माणसाची कथा जनतेसमोर मांडली याबद्दल.. मेळघाट असे अनेक अज्ञात परीक्षित आपणास जागोजागी भेटतील..ज्या लोकांना राजाश्रय मिळतो त्यांच्या वाट्याला कौतुक येतं पण जे कधीच समोर येत नाहीत असेही बरेच असतात आणि आहेतही..शक्य झाल्यास त्यांच्या ही कहाण्या वाचायला वाचायला नक्कीच आवडतील..
धन्यवाद सुधीर जी
आपल्या मताशी सहमत आहे. कृपया नावे कळवावी नक्की विचार होईल. शेवटी आपला हक्क आहे. धन्यवाद
यादवरावजी आपण केलेल्या सूंदर प्रेमळ लेखनीच्या मदतीने चतूर्थ श्रेणी कर्मचा-याची बाजू तथा व्यथा मांडल्या या करीता धन्यवाद !
आपण असेच सुंदर लिखान करूण वनअधीका-यांचे मनोबल वाढवावे ही सदीच्छा . शेवटी खानीतल्या मजूराला कामाचा मोबदला मिळतो परंतु खान मालक व हिरे घेणारा हा फक्त हि-याकडे पाहतो . तेव्हा मजूराला सूध्दा माहीत नसते की त्याने केलेले काम किती किंमतीचे आाहे .तेच या कलयूगाच्या गोष्टी आहे तरी आपण मजूराच्या कामाची किंमत केली त्या करीता एक वनअधीकारी आपला शतशा आभारी आहे ?
धन्यवाद धोटे साहेब
आपल्या ढाकनाची कुला ट्रॉफी आणि आठवणी अजूनही ताज्या आहेत. खूप खूप आभारी आहे.
खरंच खूप सुंदर लिखाण आहे व ठेवढेच वास्तविक आहे. मी परिक्ष्रित भाऊ सोबत काम केले असल्याने त्यांचे तांत्रिक ज्ञान व नवनवीन प्रयोग करण्याची हौस पहिली आहे. या व्यतिरिक्त त्यांनी drone द्वारे जंगलाचे servillance करण्यासाठी 2012-13 पूर्वीच प्रयत्न केला होता. एक उपकरण स्वतः तयार करीत होते. तेव्हा drone मार्केट सर्वसामन्या कामी वापरण्यात येत नव्हते. त्यांचे योगदान मी जवळून पाहिले आहे.
आपण एका वन सेवकास दिलेली ही लेखन भेट व ओळख बद्दल आपले आभार.
पुढील लेखणीस शुभेच्छा सर.
धन्यवाद घागरे साहेब
आपला उल्लेख केला आहे परीक्षित यांनी….!
यादक तरटे पाटीलजी .
अतिशय सुंदर लिखान व तेवढ्याच आत्मीयतेने आपण श्री परीक्षित यांचे वनकार्य तसेच वनयोध्यानच्या व्यथा व कथा यांमध्ये आपण हात घातला. याबद्दल आपले आभार व पुढील लेखनास वनमय? शुभेच्छा???
धन्यवाद संदेश पाटील साहेब
आभारी आहे.
मा. डंभारे साहेबांसारख्या कर्मचार्यामुळे संबधित डीपार्टमेंटचा विकास, नाव व रक्षण होते सरजी…..
त्यांच्या कार्याला प्रणाम….
बरोबर
धन्यवाद
आपापल्या क्षेत्रात झोकून देऊन काम करणारे खूप सारे लोक असतात.. डंभारे सरांचे काम खरच प्रशंसणीय आहे.. .एक कौतुकाची थाप पाठीवर पडण्याने त्यांना कामात आणखी उत्साह निर्माण होणार यात शंका नाही. तुम्ही डंभारे सरांबद्दल खुप आपलेपणाने लेख लिहिलाय… तुम्ही फक्त निसर्ग वेडेच नाहीत तर सामाजिक सुध्दा आहात.. म्हणुनच डंभारे सरांचे काम जनतेसमोर मांडले. तुमच्या पुढील लेखासाठी शुभेच्छा.
अगदी खरय, आभारी आहे.
धन्यवाद